सध्या उत्तर प्रदेश येथील मेरठमध्ये घडलेल्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. काही लोकांचे आयुष्य वैचारिक दारिद्रयाने भरलेलेच असते. त्यांना सोन्याचे वाडगे जरी दिले तरी ते त्या सोन्याच्या वाडग्यातून भीकच मागणार. मेरठमधल्या मुस्कानला विदेशातला नवरा मिळाला. आई वडिलांनी छपरी मुलापासून तिची सुटका केली.. पण त्या ककर्म दरिद्रीने बिचाऱ्या नवऱ्याला मारून त्याचे १५ तुकडे करून छपरी सोबत पळून जाणे पसंत केले.
जेव्हा १४ व्या वर्षी ती तीनदा पळून गेली होती तेव्हाच जर आई वडिलांनी तिच्यावर पाणी सोडलं असतं तर आज कोणाचा तरी मुलगा जीवंत असता. आयुष्यभर कष्ट करून बाहेरच्या देशात नोकरी करणारा.. आपल्या आई वडिलांसाठी आणि सुखी संसारासाठी झटणारा सौरभ मात्र यामध्ये नाहक मारला गेला. जर त्याच्या सोबत राहायचेच नव्हते तर त्यांच्याकडून काडीमोड घेऊन तरी बाजूला व्हायचं. पण, आजचे जग कोणत्या विचाराने इतके क्रूर झाले आहे देवास ठाऊक.. हेच कलियुग म्हणावे की काय! हल्ली कोणावरही विश्वास ठेवणे या जगात कठीण झाले आहे. त्यामुळे मुलांनो लग्न करताना कृपया सावध रहा.. एकवेळ आयुष्यभर लग्न नाही जमले
तरी चालेल पण पोटगीसाठी किंवा बायकोच्या बाहेरच्या चाळयासाठी स्वत:चा जीव गमावू नका.
- नेहा रोहित तांबे
-

0 Comments